🙈सध्या शेअर मार्केट कडे बघून एक गोष्ट आठवत आहे... आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल...
😁😁 newbies be careful
👇👇
एका गावात चिक्कार माकडं होती. एक दिवस एक व्यापारी गावात आला त्याने जाहिरात लावली – माकडं विकत घेणे आहे. दर १००० रुपये प्रति माकड. व्यापाऱ्याने एक मोठा वाडा भाड्याने घेतला त्यात माकडे ठेवायला सोयी करून घेतल्या. गावातील लोक अचंबित होऊन हा उद्योग पाहत होते. एका माकडावर हजार रुपये कोणी देईल यावर गावातल्या लोकांचा विश्वास बसत नव्हता तरी एका हुन्नरी गृहस्थाने एकअंगणात खेळणारे एक माकड पकडले व एका पिंजऱ्यात घालून ते व्यापाऱ्याकडे हजर केले. व्यापाऱ्याने तत्काळ दोन पाचशेच्या करकरीत नोटा या गृहस्थाच्या हातात टेकविलया. बातमी गावभर झाली. रिकामंटेकड्यांची गावात कमी नव्हतीच पण कामधंदे असणाऱ्या लोकांच्या तोंडसही या बातमीने पाणी सुटले. पुढील एका आठवड्यात लोकांनी झपाझप माकड पकडली आणि व्यापाऱ्यास विकली. पुढील आठवड्यात व्यापाऱ्याने जाहीर केले कि त्याला हवी तेवढी माकडे मिळत नाहीयेत म्हणून तो प्रति माकड २००० रुपये द्यायला तयार आहे. लोक उत्साहाने कामाला लागले. गावातली बहुतांश माकडे पकडली गेली फक्त काही अतिचतुर आणि सावध माकडे गावकऱ्यांच्या हातात लागली नाहीत. काही लोकांनी एकेका माकडा मागे दोन हजार कमविले. त्या रविवारी व्यापाऱ्याने जाहीर केले कि एवढे पैसे देऊनही तुम्ही लोक मला हवी तेवढी माकडे देत नाही आहात चला मी एका माकडाचे पाच हजार रुपये देतो. गावकर्यांना नवीन हुरूप आला. गावातली उरली सुरली माकडे शिताफीने पकडलीच पण आजूबाजू च्या गावातूनही लोकांनी माकडे पकडून आणली. व्यापाऱ्याने खरोखरच एकेका माकडाचे पाच हजार दिले. पण त्याची निराशा लपत नव्हती. त्याने जाहीर केले कि बाबानो मी एवढा पैसे द्यायला तयार आहे तरी तुम्ही एवढे ढिल्ले का पडताय? आणा कि दनादन पकडून. बर पाच हजार कमी वाटत असतील तर मी एकेका माकडामागे दहा हजार द्यायला तयार आहे. पुढचा एक आठवडा मी बाहेरगावी जातोय एक आठवड्याने परत येईन आणि तुमची माकडे दहा हजार ला एक या दराने विकत घेईन. आता कामात हयगय करू नका.
वाड्यात कोंडलेल्या माकडांची काळजी घ्यायला व्यापाऱ्याने एक विश्वासू नोकर मागे ठेवला आणि तो आपले काम आटोपण्यासाठी एक आठवड्यासाठी बाहेरगावी गेला. इकडे गावकऱ्यांची तारांबळ उडाली आता नवीन माकडे आणायची कुठून? पण व्यापाऱ्याच्या विश्वासू नोकरानेच मार्ग दाखविला. म्हणाला लोकहो या व्यापाऱ्याचं धंद्यात काही लक्ष नाही किती माल विकत घेतला याचे हिशेब ठिशेब मीच ठेवतो याला आत्ता वाड्यात एकूण किती माकडे जमा आहेत याचा काहीही पत्ता नाही. तर तुम्ही हि माकडे सात हजार रुपये प्रति माकड या दराने घरी घेऊन जा आणि पुढल्या आठवड्यात आमचे शेट आले कि तीच माकडं त्यांना दहा हजार रुपयाला एक या दराने विका. काहीही कष्ट न करता फक्त एक माकड आठवडाभर घरात बाळगून घर बसल्या तीन हजार रुपये कमविण्याची युक्ति गावकऱ्यांना पसंद पडली. हा हा म्हणता गावकर्यांनी या नोकर कडून जोरदार माकड खरेदी केली. लोकांनी कर्ज काढून पाच पाच माकडे वाड्यावरून घरी नेली. आणि पुढील सोमवारी व्यापाऱ्यास एकेक माकड दहा हजार रुपयास विकण्याचे स्वप्न पाहण्यात गुंग झाले. पुढचा सोमवार आला लोक रजा घेऊन व्यापार्याची वाट पाहत होते. पण व्यापारी उगवायची चिन्हे दिसेनात. अख्खा गाव आशेने वाड्यावर लोटला तर वाडा सताड उघडा नोकराचाही पत्ता नाही. दिवसभर लोकांनी वाट पहिली…. त्यानंतर त्या गावात आजतागायत ना व्यापारी दिसला ना त्याचा नोकर. गावकऱ्यां कडे घरात सात हजार रुपयास एक या दराने खरेदी केलेली माकडे उरली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा