मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

खेळाचे महत्व

 आपण ज्या वेळेस पुस्तक वाचत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळी तुम्ही खेळ खेळा असं लिहिलेलं असतं पण खरंच आपण खेळ खेळतो का? खेळतही असो पण मोबाईलवर. मोबाईल वर असणाऱ्या गेम आपण खेळतो. त्या मोबाईल वरच्या गेम्मुळे आपल्या डोळ्यांना त्रास होतो फक्त डोळ्यांनाच नाही तर हळूहळू आपल्या मनावर वाईट परिणाम होत असतो. हे सर्व मोबाईल वापरामुळे होते तेही जास्तीच्या वापरामुळे. मोबाईलचा वाढलेला वापर ही खरंतर आजची धोकादायक घंटा आहे. आपण जरी आपल्या मोबाईलचा दिवसभरातील वापर पाहिला तर तो सरासरी सात ते आठ तास असतो आणि इतका वेळ आपण मोबाईल साठी देतो. व्यक्तिपरत्वे हा वेळ कमीजास्त असू शकतो. यावर आपले नियंत्रण असायला हवे.

  मग कोणताही खेळ खेळायचा असेल तर तो खेळ  मैदानी असावा. आपल्या दिनक्रम मध्ये किमान एक तास मैदानी खेळ खेळायला हवे. पण आजच्या धावपळीच्या युगात खरच एवढा वेळ मिळतो का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही अस आहे. मग खरंच आपण चुकीच्या मार्गाने जात नाही ना ! फक्त आणि फक्त पैसे मिळवणे हे जर ध्येय ठेवलं तर बऱ्याच आनंदावर विरजण पडेल. कारण पैशापेक्षा श्रेष्ठ असतो तो आनंद आणि तो मिळवणे गरजेचे आहे. 

खेळातून निश्चितपणे आनंद मिळतो आणि तो आनंद सर्वांनी मिळवायला च हवा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा