गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

अभिजात भाषा मराठी

 आजची सर्वात आनंदाची बातमी म्हणजेच *मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला*.. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण याचे नक्कीच चांगले परिणाम होतील. 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

दिवसेंदिवस *जे इंग्रजीचे अवाढव्य महत्त्व वाढले होते ते नक्कीच कमी होईल.* 

काही पालक वर्गातील गैरसमज -

पालक वर्गात विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून शिकावा किंवा शिक्षणं हे सेमी इंग्रजी असावे , आम्ही आमच्या मुलाला मोठ्या शाळेत पाठवतो जिथे फी एक लाख रुपये आहे..

या सर्व अवाढव्य इच्छांचे नक्कीच पाय कापले जातील.

इंग्रजीचे महत्त्व नक्कीच कमी होईल. 

विद्यार्थ्यांच आकलन हे त्याच्या मातृभाषेतूनच होत .. त्यामुळे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून असावे.* म्हणून जिल्हा परिषद शाळा महत्वाची.

*इंग्रजी ही फक्त भाषा आहे*. आणि  भाषा ही संवादाचे साधन आहे.. ज्ञान नव्हे. त्यामुळे इंग्रजी भाषा बोलण्यापुरतेच असावी. इंग्रजी ही भाषा म्हणून शिकण्यास काहीच अडचण नाही.

अभिजात भाषेचे फायदे -*

पुढील काही वर्षात इंजीनियरिंग ,  डॉक्टर इत्यादी उच्च शिक्षण हे सर्व शिक्षण मराठी भाषेतून होईल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा